सात नवीन प्रोडक्टस् गुंतवणुकीसाठी सादर – गुंतवणूक वाढता वाढता वाढे
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील वर्षात कोरोनामध्ये म्युच्युअल फंडांप्रती गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखवला आहे. आता म्युच्युअल फंड उद्योगांनी नवीन फंड ऑफर (एनएफओ) म्हणजे नवीन उत्पादनांचे लाँचिंग केले आहे. सध्या सात म्युच्युअल फंडांकडून नवीन प्रोडक्ट सादर करण्यात आले आहेत. यात गुंतवणूक ही 500 रुपये ते कमीत कमी 100 रुपयांपर्यंत करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडच्या काळात नवीन गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे वळत असल्याचे अभ्यासकांचेही मत आहे.
प्रमुख म्युच्युअल फंड्स खालीलप्रमाणे
आदित्य बिर्ला, सन लाईफचा मल्टीकॅप
सदरच्या सात प्रोडक्टसंदर्भात चर्चा करताना आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडच्या मल्टीकॅप प्रोडक्टचा उल्लेख होतो. हे एक असे प्रोडक्ट आहे, की समभाग, लहान समभाग आणि मध्य आकारातील समभागात कमीत कमी 25 टक्क्यांची गुंतवणूक करता येते. अन्य रक्कम ही दुसऱया ठिकाणी गुंतवली जाण्याची माहिती आहे.
एचडीएफसीचा फंड ऑफ फंड्स
एचडीएफसीचे हे प्रोडक्ट फंड ऑफ फंड्स आहे. असेट ऍलोकेटरच्या अनेक सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजेच आपले पैसे अनेक ठिकाणी लावणे होय.
ऍक्सिसचे एएए बॉण्ड
ऍक्सिस म्युच्युअल फंडने एएए बॉण्ड प्लसच्या नावाने आपले प्रोडक्ट सादर केले आहेत. यामध्ये कंपनी ही एएए असणाऱया बॉण्डमध्येच गुंतवणूक करणार आहे. एएए बॉण्ड हे याच्यासाठी सुरक्षेच्या संदर्भात सर्वात उच्च पातळीवर असल्याची माहिती आहे.
कॅनरा रोबॅकोच्या फंडावर ध्येय
कॅनरा रोबॅको म्युच्युअल फंडने निश्चित अशा इक्विटी फंडचे सादरीकरण केले आहे. यामध्ये एक ओपन एंडेड इक्विटी योजना आहे. जास्तीत जास्त 30 समभागामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल.मिरॅचा ईटीएफ प्रोडक्ट मिरॅ असेटने एनवायएसइ फॅग इटीएफ नावाने नवीन प्रोडक्टचे सादरीकरण केले आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड होणार आहे. यात ऍमेझॉन, गुगल, फेसबुक, आणि नेटफ्लिक्स यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश राहणार आहे.









