नवी दिल्ली :
शेअर बाजारातील सेबीने म्युच्युअल फंड युनिटस्च्या खरेदीकरताची वेळ आता वाढवली आहे. यापुढे आता गुंतवणूकदारांना युनिटस्ची खरेदी वा विक्री दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्वीप्रमाणे करता येणार आहे. सोमवार 19 ऑक्टोबरपासून ही नवी वेळ सेबीने नेमून दिली आहे. फंडाबाबतची व्यवहाराची वेळ बदलल्याने गुंतवणूकदारांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी बदललेल्या वेळेमुळे गुंतवणूकदारांना अडचणी जाणवल्या होत्या.









