प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील एक डोंगरावर ग्राम पंचायतीची कोणतीही परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याची तकार खुद्द ग्राम पंचायतीने उपविभागिय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
दापोली तालुक्यातील मौजेदापोली येथे जानाईदेवी मंदिर आहे. या मंदिरालगत असणाऱया डोंगरात जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने मोठ्या पमाणात खोदकाम सुरू आहे. याबाबत मौजेदापोली ग्राम पंचायतीने हरकत घेतली आहे. त्यांनी आपल्या हरकतीत म्हटले आहे की, आपल्या ग्राम पंचायतीच्या हद्द्ाrत या डोंगराच्या खोदाईचे ग्राम पंचायतीची कोणतीही परवानगी न घेता खोदकाम सुरू आहे.
या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे. या विनापरवाना खोदकामामुळे डोंगरावरील माती सैल झाली आहे. ती या पावसाळ्यात भुस्खलन होवून खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या पमाणात जीवित हानी होवू शकते. यामुळे सदर खोदकाम तात्काळ थांबवण्यात यावे, असा अर्ज मौजे दापोली ग्राम पंचायतीने उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे. यावर उपविभागिय अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









