वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं, ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली’
मुंबई/प्रतिनिधी
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब टप्प्याटप्प्याने धक्कादायक खुलासे आणि माहिती उघड करत आहेत. आज रविवारी पुन्हा मलिक आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. रविवारी हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य आहेत आणि ती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती.
मात्र मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्या आधी त्यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. यामध्ये एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यातील संभाषण आहे, असा दावा मलिक यांनी केलाय. या संभाषणात सॅम या अधिकाऱ्याला भेटण्याचा दिवस ठरवत आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत नवे गौप्यस्फोट केले. त्यांनी २ ऑक्टोबरला एनसीबीने कारवाई केली. ३ तारखेला यामध्ये आर्यन खान असल्याचं समोर आलं. दरम्यान, ही कारवाई फेक असल्याचं आम्ही म्हटलं होतं. याप्रकऱणी दोघंजण आर्यन खानला नेत असलेले व्हिडिओ जारी केले होते असं नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मलिक यांनी या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. तर हाय प्रोफाइल संशयित आरोपीला एनसीबीच्या मुख्यालयात घेऊन जाणारे ते दोघे कोण असा प्रश्न तेव्हा विचारला होता असंही मलिक म्हणाले. तेव्हा एनसीबीने ते पंच असल्याचं उत्तर दिलं होतं.
कारवाई नंतर त्यानंतर आणखी एक खुलासा केला होता की, ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं. एक वरिष्ठ अधिकारी खात्रीने का सांगू शकत नाही की नेमकं किती लोकांना अटक केली आणि ताब्यात घेतलं असा सवालही मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. सुरुवातीपासून अनेक खुलासे केल्याचं सांगत मलिक यांनी आतापर्यंत काय घडलं तेसुद्धा सांगितले. समीर वानखेडेंनी सुरुवातीला नेमकी माहिती दिली नाही. नंतर ११ नाही तर १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. पुन्हा लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. तेव्हा सोडण्यात आलेल्या लोकांची नावे सांगा असं आम्ही विचारलं पण ते सांगितलं नाही. त्या तीन लोकांना सोडण्यातच खरी गेम आहे.
मोहित कंबोजने आर्यन खानला खंडणीसाठी किडनँप केलं
नवाब मलिक यांनी मोहित कम्बोज यांनी आर्यन खानला खंडणीसाठी किडनँप केलं असा आरोप केला आहे. मोहित कम्बोजच्या मेहुण्याद्वारे सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला अडकवण्यात आले असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मोहित कंबोजा भाजपचा पदाधिकारी आहे. दीड वर्षापूर्वी सीबीआय़ने त्याच्या घरावर छापा टाकला. गेल्या महिन्याभरापासून ही व्यक्ती पूर्णपणे बिथरली आहे. न्यायालयाच्या कामकाजातही ही गोष्ट आली की, आर्यन खान हा स्वत:हून तिकिट काढून गेला नाही. तर त्याला प्रतिक गाबा आणि अमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून गेला. हे पूर्ण प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे. मोहित कंबोजच्या भाच्याच्या मदतीने हे सगळं जाळं पसरवण्यात आलं. यात १८ कोटींचे डील झाले पण एका सेल्फीने सगळा खेळ बिघडला असंही मलिक म्हणाले.
अपहरणाचा मास्टरमाइंड हा मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. शहरात त्याची १२ हॉटेल्स आहेत आणि ती हॉटेल्स चालवण्यासाठी शेजारच्या हॉटेल्सवर खोट्या कारवाया करवून घेतल्या. वानखेडे आणि कंबोज हे ७ तारखेला ओशिविरा कब्रस्तानाच्या बाहेर भेटले. त्याचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा प्रयत्न केला. तिथल्या स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली. तिथे पोलिसांचे सीसीटीव्ही बंद होते त्यामुळे फूटेज मिळू शकले नाही असेही मलिक यांनी सांगितले.
वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं
वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं असा घणाघात नवाब मलिक यांनी केला. मी चुकीच्या लोकांविरोधात लढतोय. शहरात ड्रग्जच्या नावावर निरपराध लोकांना घाबरवलं जात आहे. हजारो कोटींची वसुली होत आहे याच्या विरोधात मी लढतोय. गेल्या महिन्याभरापासून ही बातमी चर्चेत आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी वक्तव्य केलं होतं की, पहिल्यांदाच समुद्रात कारवाई झाली. पण खरंतर असं काहीच नव्हतं. पब्लिसिटीचा स्टंट होता हा, लोकांना टार्गेट केलं गेलं. आर्यनचं अपहरण केलं आणि खंडणीची मागणी केली गेली असा आरोप मलिक यांनी केला.