प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ते मोहरे ता. पन्हाळा जाणाऱ्या रोडवर मोहरे गावांचे प्रवेश कमानीजवळ अज्ञात वहानाने जोराची धडक दिल्याने सांगली जिल्ह्यातील मांगले ता. शिराळा येथील वैभव विलास मस्के वय ३५ हा तरुण जागीच ठार झाला. मोहरेच्या पोलीस पाटील उषा बाजीराव घोंगडे यानी कोडोली पोलीसात याबाबत फिर्याद नोंदवली आहे.
अज्ञात वाहनावरील अज्ञात वाहनस्वाराने आज दि. ३० रोजी दुपारी २ वा.चे पुर्वी अपघातातील मयत वैभव मस्के यांच्या बजाज मोटरसायकलला जोराची धडक दिली यातच वैभव याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तपास पो.ना. सानप करीत आहेत.
Previous Articleसाताऱ्यात होणार जम्बो कोविड सेंटर
Next Article सांगली : आटपाडीत 100 बेडचे कोविड सेंटर उभारणार









