वारणानगर / प्रतिनिधी
मोहरे (ता.पन्हाळा) येथील शेतातील घराचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने अकरा हजाराचा मुद्देमालावर डल्ला मारला. या बाबतची फिर्याद मोहन बाजीराव शेळके यांनी कोडोली पोलीसात दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहन शेळके यांचे मोहरे (ता.पन्हाळा) येथील गट नं .४०८ मधील शेतात घर आहे. या घराचे कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून ३२ इंची एलईडी टिव्ही व भिंतीवरील फॅन चोरून नेवून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी दि. ८ रोजी पहाटे अडीच वाजता शेळके शेतात आल्यानंतर लक्षात आल्यावर त्यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली तदनंतर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संकपाळ करीत आहेत.









