इराणच्या राजधानीत अल कायदा कमांडर ठार
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कमांडरला ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या सूचनेनुसार इस्रायलने ठार केले आहे. दहशतवादी गटात दुसऱया क्रमांकावर असलेला हा कमांडर 1998 मध्ये आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराचा साथीदार होता.
अमेरिकेने 1998 मध्ये केनिया आणि टांझानिया येथील अमेरिकेच्या दूतावासांवर झालेल्या अलकायदाच्या भीषण हल्ल्यांचा सूड 22 वर्षांनी घेतला आहे. अमेरिकेच्या वतीने इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या हस्तकांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये लपलेल्या अल-कायदाचा क्रमांक दोनचा म्होरक्या अबू मोहम्मद अल मस्त्राr (58 वर्षे) याला ठार केले आहे. या कारवाईत ओसामा बिन लादेनची पुत्रवधूही मारली गेली आहे.
अल कायदाने घडविलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 224 जण मारले गेले होते. या स्फोटांचा सूत्रधार अबू मोहमद होता. त्याला मुलीसह 7 ऑगस्ट रोजी तेहरानच्या रस्त्यांवर गोळय़ा घालण्यात आल्या आहेत.









