प्रतिनिधी / कोल्हापूर
मोबाईल चोरी करणाऱ्या मिरज येथील महिलेस लक्ष्मीपुरी पोलीसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचे दोन मोबाईल पोलीसांनी जप्त केले. आरती गंगाप्पा भोसले (वय 25 रा. मिरज, सांगली) असे तिचे नांव आहे. उत्तरेश्वर पेठ येथील दोन मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. दरम्यान या महिला जेवण मागण्याच्या बहाण्याने गल्लीबोळात फिरत आणि घरातील मोबाईल लंपास करत होत्या. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके यांनी ही कारवाई केली.









