हुक्केरी पोलिसांची कारवाई, 16 मोबाईल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
मोबाईल चोरी प्रकरणी कल्लोळ्ळी येथील दोन तरुणांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 1 लाख 8 हजार 900 रुपये किंमतीचे 16 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे मंडल पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. गुडगनट्टी, आर. आर. गिड्डप्पगोळ, ए. जी. चिकोडी, विठ्ठल नायक, महेश करगुप्पी आदींनी ही कारवाई केली आहे.
विनोद कल्लाप्पा खानापूर, सदानंद महादेव मुंडीगनाळ (दोघेही रा. कल्लोळ्ळी) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळींची नावे आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता हुक्केरी येथील कोर्ट सर्कल जवळ चोरीचे मोबाईल विकताना त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 41 (डी), 102 सीआरपीसी व भा.दं.वि. 379 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









