वडाप चालकास अटक
वारणानगर / प्रतिनिधी
मसुद माले ता. पन्हाळा येथील विवाहित महिला स्नान करत असताना मोबाइलमध्ये चोरून काढलेले फोटो व चित्रीकरणाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या वडाप चालक संतोष बाळासो सोळसे याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोळसे याने मोबाइलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ब्लॅकमेल करून गेली दोन वर्ष अत्याचार करून ५० हजाराची मागणी केल्याची पीडित महिलेकडे केली होती.
सोळसे याच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितीने फिर्याद दाखल केली. सोळसे यास न्यायालयापुढे हजर केल्यावर पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील करत आहेत.









