नवी दिल्ली/प्रतिनिधी
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून राहुल गांधी रोजच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. दोन दिवसापूर्वी त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदींवर टीका केली होती. आज पुन्हा त्यांनी बेरोजगारीवरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे सीएमआयईने जारी केलेल्या अहवालात चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये १५ लाखांहून अधिक लोकं औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रांतून बेरोजगार झाले आहेत, अशी माहिती सीएमआयईने आपल्या अहवालात दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा समर्थन देत नाहीत. ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्याही हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीयांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.









