तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली. राज्य सरकार पेक्षा केंद्र सरकार वाईट आहे. एखाद्या घरातील व्यक्ती दारूसाठी पत्नीला मारहाण करतो. घरातील वस्तू विकून व्यसन पूर्ण करत असतो आणि शेवटी दारूसाठी घर देखील विकतो. तसाच व्यक्ती देशाचा पंतप्रधान असून त्याने देशच विकायला काढल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
अक्कलकोट येथील सांगवी खुर्द,आंदेवाडी येथील पूरग्रस्त भागाचा दौरा संपल्यावर ते सोलापूर शहर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकार व केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी राज्य सरकारने टोलवाटोलवी करू नये तत्काळ मदत करावी असे सांगितले.राज्य सरकार ने केंद्रा कडे बोट ना दाखवता पब्लिक फंडातून मदत घोषित करावी. या पत्रकार परिषदेत आंनद चंदनशिवे, गणेश पुजारी,ज्योती बमगोंडे,बबन शिंदे, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.
खावटी योजनेतून शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार रुपये मदत करण्याची मागणी
अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
फडणवीसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते
राज्याचे माजी मुख्यमंत्री असे कोणतेही घटनात्मक पद नसून देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेली याचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता जमिनीवर येऊन विरोधकाची भूमिका बजावावी, त्यांना अजूनही मुख्यमंत्री असंल्यासारखे वाटत आहे.
अजून काय म्हणाले, आंबेडकर
कारखानदारांना थकहमी देण्यासाठी तिन पायाच्या सरकारमधील दोन पाय एका पायावर दबाव टाकत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला
ऊस तोड कामगार सोबतचा करार संपला असून आता नवा करार करण्याच्या निमित्ताने बीडला 25 सप्टेंबरला विशेष परिषद
सरकारने अनुदानाच्या स्वरूपात धान्य, भांडी, कपड्याची मदत करावी
मंदिर मशीद व अन्य धार्मिक स्थळे लवकरात लवकर उघडावी
मुख्यमंत्र्यांनी ठराविक जिल्ह्यातील काही भागांची पाहणी न करता सर्व नुकसान नुकसानग्रस्त भागाचा दौरा
शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल









