मुंबई \ ऑनलाईन
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. या भेटीवर संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ दिली असून या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. म्हणाले की, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी यावेळी चर्चा झाली.
महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला मराठा आरक्षणाचा विषय ताणला जाऊ नये असं वाटत आहे. मराठा, ओबीसी असे अनेक विषय असून प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी भीती देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








