नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी कोर्टात आज, गुरूवारी हजर झाले आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी हा खटला दाखल केला होता. याचप्रकरणी आज राहुल गांधी जबाब नोंदण्यासाठी कोर्टात हजर झाले आहेत.यापूर्वी राहुल गांधी यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी आपण दोषी नसल्याचं म्हटलं होतं.
काही तासापूर्वीच राहुल गांधींनी केलेल्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा
राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्या विरोधात भाजप आमदर पुर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्यांचा अंतिम जबाब नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार राहुल गांधी आज कोर्टात हजर झाले आहेत. तसेच कोर्टाच हजर होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी एक लक्षवेधी ट्वीट केले आहे. या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यांनी म्हटले आहे की, कशाल्याही प्रकारची भीती, भय न बाळगणे हेच खरअस्तित्वाचे संपूर्ण रहस्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नेमका वाद काय आहे ?
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकमधील सभेत केलेल्य्या वक्तव्याच्या आधारे ही तक्रार करण्यात आली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं सारखं आडनाव कसं काय? सर्व चोरांचा मोदी हेच आडनाव कसं काय आहे?, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राहुल गांधी त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते.