नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशाने करोना प्रतिबंधक लसीकरण (vaccination) मोहिमेत १०० कोटींचा मोठा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 100 कोटी लसीकरण ही फक्त एक संख्या नसून देशातील जनतेच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे, असे संबोधन करत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांची पाठ थोपटली. यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातल्या लस उत्पादकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला (Cyrus S. Poonawalla Managing Director of the Serum Institute of India) यांनी भारताने १ अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच, असं म्हणत त्यांनी मोदींच कौतुक केलं
एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधानांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन सगळ्यांना वेगाने हालचाल करायला लावली. ते नसते आणि फक्त आरोग्य मंत्रालयाकडे नियंत्रण असतं तर आज भारत एक अब्ज डोस तयार करू शकला नसता.”
सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अदर पूनावाला (Adar Poonawalla Chief Executive Officer of the Serum Institute of India) यांनी देश आणि लस उत्पादकांना महत्त्वपूर्ण संख्या गाठण्यास मदत केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. “सरकारसोबत आम्ही काम केले आहे आणि याच कारणामुळे आम्ही हे लक्ष्य साध्य करु शकलो. आम्ही भविष्यातील योजना आणि संबंधित धोरणे कशी वाढवू शकतो यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. भारताने लस निर्यात आणि उत्पादनात पुढे राहणे आवश्यक आहे”, अदर पूनावाला म्हणाले.









