नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याला धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. संसद सभागृहात शेतकरी आंदोलनावर चाललेल्या चर्चेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने ही धमकी आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर बरेच आरोप केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली. त्यानंतर फोनवरून त्यांना ही धमकी मिळाली आहे. फोन करणाऱया व्यक्तीने वारंवार तुम्ही मोदींवर टीका का करत आहात? असा प्रश्न केला आहे. तसेच मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या आता मोदींना कराव्या लागत आहेत, असेही सदर इसमाने म्हटले आहे.









