ऑनलाइन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेशी संवाद साधत रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट बंद करून मेणबत्ती पेटवून कोरोना विरोधात सामूहिक शक्ती दाखवण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या आवाहनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकार वर ट्विट च्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
ते आपल्या एका ट्विटमध्ये म्हणतात की, मी मुर्ख नाही. मी त्या दिवशी एकही मेणबत्ती लावणार नाही, लाईट बंद करणार नाही असे म्हणत देशाला इतके ही मुर्खात काढू नका, असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदींकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तरी वेगळं बोलण्याची अपेक्षा होती. पण मोदी या संकटाचा ही इव्हेंट करू पाहत आहेत.
आव्हाड यांनी ‘नागीन’ या चित्रपटातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटो ही शेअर केला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये नव्या ‘निरोचा जन्म’ आणि ‘अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में’ असं म्हणत ट्विट केले आहे.