ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने लसीकरणाची शंभरी साजरी केली, त्याच पद्धतीने त्यांनी इंधनाची शंभरीही साजरी करावी, असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी विरोधकांना लगावला.
चिदंबरम यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा नुकताच साजरा केला. त्यांनी इतरही शंभरी साजरी करून नवा आदर्श समोर ठेवायला हवा. काही आठवडय़ांपूर्वीच पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत आणि आता डिझेलच्या किंमतीने लीटरमागे 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
सेलिब्रेशनसाठी आणखी एक संधी आहे. कारण गॅस सिलिंडरच्या किंमतीनेही आता 1000 रुपयांचा टप्पा गाठला आहे’, असंही चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.









