ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 1 वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. मात्र, या वेळेत बदल करण्यात आला असून, ते दुपारी 4 वाजता सिरममध्ये दाखल होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे सिरम भारतात उत्पादन करत आहे. कोरोना लसीचा आढावा आणि निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मोदी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे जाऊन पाहणी करणार आहेत. अहमदाबाद येथून पाहणी केल्यानंतर मोदी सिरम इन्स्टिट्यूटला दुपारी 1 वाजता भेट देणार होते. मात्र आता या वेळेत बदल करण्यात आला आहे. मोदी दुपारी 4 वाजता सिरममध्ये दाखल होतील.
पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी पुण्यात तयारी सुरू असून, कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.








