प्रतिनिधी / कराड :
आपल्या देशातील काही ठराविक लोकांची हेरगिरी पेगासस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. पेगासस हे सॉफ्टवेअर हेरगिरी करण्यासाठी बनविले गेले असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे सॉफ्टवेअर फक्त सरकारी यंत्रणानाच विकले जाते. त्यामुळे आपल्या देशात या सॉफ्टवेअरचा झालेला वापर हा कुणी केला हे स्पष्ट समजते. पंतप्रधान मोदींच्या इस्राईल दौऱ्यांनंतरच भारतात पेगाससचा शिरकाव झाल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.









