ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविरात्री रात्री 8.45 वाजता अचानक संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली. मोदींनी या ठिकाणी जवळपास एक तास बांधकामाची पाहणी केली.
नवी दिल्लीत संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, ते 2022 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे 2022 मधील संसदेचे पावसाळी अधिवेशन हे नव्या इमारतीत घेण्याचा सरकारचा विचार आहे. संसदेची नवीन इमारत त्रिकोणी आकाराची असून, ती जुन्या इमारतीच्या 17 हजार चौरस मीटर एवढी मोठी असणार आहे. या संसद भवनात लोकसभेत 888 सदस्यांसाठी तर राज्यसभेच्या 326 सदस्यांची आसन व्यवस्था तसेच प्रत्येक सदस्यासाठी 400 चौरस फुटांचे ऑफिस असणार आहे. मागील वर्षी 10 डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची पायाभरणी केली. या इमारतीचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड करत असून, या प्रोजेक्टवर 971 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.









