सातारा/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून आपले दुकान सुरू ठेवल्या प्रकरणी बलशेठवार, आकाश उधानी, मोहित कटारिया, प्रवीण लाठी, मंगेश बलशेठवार यांच्यावर शाहूपुरी पोलिसांनी काल सायकांळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सपोनि विशाल वायकर, पो.कॉ. यादव, भोसले, पो.ना.लैलेश फडतरे हे दि.14 रोजी पो.कॉ. धनंजय कुंभार हे राजवाडा गोलबाग पासून मोती चौक पर्यंत पायी पेट्रोलिंग करत होते तेव्हा त्यांना 10.32 वाजता लोकमान्य टिळक स्टेशनरी हे दुकान उघडे दिसले.पोलिसांना पाहून तीन ग्राहक पळून गेले. त्यावेळी पोलिसांनी दुकान मालकास विचारले. त्यावेळी मी दुकान उघडले नाही असे उडवा उडवी चे उत्तर दिले. त्यास नाव विचारले असता त्याने बलशेठवार असे अपूर्ण नाव सांगितले. तसेच 10.59 वाजता पोलिसांना आनंद क्लॉथ सेंटर येथे गर्दी असल्याचे दिसले.पोलिसांनी दुकान मालकाचे नाव विचारले असता आकाश राजकुमार उधानी(वय 27, रा.शुक्रवार पेठ असे सांगितले. दुकानात ग्राहक मुमताज सिकंदर बागवान (रा.जाधव वाडा प्रतापगंज पेठ ) या साहित्य खरेदी करताना आढळून आल्या. तसेच 11.09 वाजता सिटी सेंटर हे दुकान अर्धवट उघडे ठेवल्याचे पोलिसांना दिसले.पोलिसांनी दुकानात जाऊन दुकान मालकाचे नाव विचारले असता मोहित शांतीलाल कटारिया असे सांगितले.पोलिसांनी त्यांना कापड दुकान का सुरू ठेवले आहे असा प्रश्न केला, त्यावर दुकानदाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मास्क विक्री करण्यासाठी 10 कामगार ठेवले आहेत. असे सांगताच पोलिसांनी एवढे कामगार का ठेवले असा प्रश्न केला. ते दुकानांची साफसफाई करत आहेत अशी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दुकानात पोलीस शेवटच्या मजल्यावर गेले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी लग्न सोहळ्यासाठी खरेदी करणारे ग्राहक राजेश पांडुरंग कदम (जगतापवाडी शाहूनगर), साईश शिवाजी काशीद (अमरलक्ष्मी कोडोली) हे आढळून आले. मेनका कापड दुकान पोलिसांना उघडे असल्याचे दिसले तेथे ही पोलिसांना गर्दी असल्याचे दिसले. दुकान मालक प्रवीण नंदकुमार लाठी (वय45, रा.भवानी पेठ) असे सांगितले.तेथे कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पोलिसांनी नाव विचारले असता रश्मी समीर शेख(शुक्रवार पेठ), युवराज कृष्णत कचरे(गोळीबार मैदान), वैशाली दिलीप शिंदे (पानमळेवाडी), प्रीतम प्रमोद जाधव(कोडोली) या चार ग्राहकांनी लहान मुलांची कपडे खरेदी करण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले.11.45 वाजता पोलिसांना बलशेठवार स्टेशनरीचे दुकान उघडे दिसले. पोलिसांनी दुकानदारास नाव विचारले असता मंगेश सत्यविजय बलशेठवार असे सांगितले तर त्या दुकानात ग्राहक इंदू दिलीप भोसले (वय 56, यादोगोपाळ पेठ) व त्यांची मुलगी असे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी बलशेठवार, आकाश उधानी, मोहित कटारिया, प्रवीण लाठी, मंगेश बलशेठवार यांच्यावर भा.द.वि.स.188, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleकॅन्टीनमध्ये काम करून फेडले शाळेचे ऋण
Next Article पॅकेजच्या आधारे गोव्याला आत्मनिर्भर बनविणार








