आमदार भास्कर जाधव यांच्याकडून कामाची पुलाच्या कामाची पहाणी
प्रतिनिधी/गुहागर
गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील मुख्य पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून दोन महिने जाणार असले तरी त्या बाजूने कॉपर डॅम करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना आमदार भास्कर जाधव यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना केल्या आहेत आणि त्यांनीही त्या तत्काळ मान्य केल्या आहेत. त्यामुळे येत्या 15 ते 20 दिवसांत हे पर्यायी काम पूर्ण होऊन गुहागरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोडकाआगर येथील पूल वाहतुकीस योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षापूर्वी तो राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीस बंद केला. हा पूल ज्या मार्गावर आहे त्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम त्यावेळी मंजूर झाले होते, परंतु नागरिकांच्या मनातील शंका-कुशंकांमुळे रस्त्याची संयु‹ मोजणी होण्यास विलंब झाला. परिणामी पुलाचे कामदेखील वेळेत सुरू झाले नाही. यावर्षी एप्रिलअखेरीस काम सुरू झाले, परंतु लवकर सुरू झालेला पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे काम बंद राहिल्याने पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता हे काम सुरू झाले आहे, परंतु ते पूर्णत्वास जाण्यास अजून दीड ते दोन महिने लागतील.
हा मार्ग बरेच दिवस बंद राहिल्याने गुहागर शहरातील जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास लक्षात घेऊन आमदार जाधव यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला. याच ठिकाणावरून तात्पुरती व्यवस्था करून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व अन्य हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करता येईल का, याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आणि त्यातून मार्गही काढला. त्याप्रमाणे सध्या काम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने मातीचा भराव करून काŸपर डŸम तयार करण्याचे निश्चित झाले.
गुरूवारी शृंगारतळी येथील रस्त्याच्या उंचीबाबत बाजारपेठ व्यापारी संघटनेने केलेल्या मागणीवरून आमदार जाधव यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात संबंधित सर्व अधिकाऱयांना बोलावून बैठक घेतली आणि रस्त्यासह इतर सर्वच प्रŽ आणि शंकांचे निरसन करून तोडगा काढला. या बैठकीनंतर त्यांनी मोडकाआगर पुलाच्या कामाची पाहणी केली. त्याचवेळी पर्यायी करण्यात येणाऱया कॉपर डॅमच्या कामाचीही माहिती घेतली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता मराठे, प्रभारी प्रांताधिकारी जयराज सूर्यवंशी, गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, ठेकेदार शिवाजी माने आदी उपस्थित होते.
Previous Articleरेल्वे खासगीकरणासाठी कंपन्यांचा उत्तम प्रतिसाद
Next Article पाकिस्तानचा ‘नापाक’ कट व्यर्थ









