जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे ट्विट
प्रतिनिधी / सांगली
सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणीसाठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवता येईल. त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे.
तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल परंतु घाबरण्याचे कारण नाही, मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे. नागरीकानी काळजी करू नये.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








