भोगावती / प्रतिनिधी
अचानक कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकल घसरुन रस्त्यावर पडल्याने हसूर दुमाला ता करवीर येथील आनंदा ज्ञानू झांजगे वय ५५ व पत्नी सौ आनंदी आनंदा झांजगे वय ५० हे मोटारसायकल स्वार पती पत्नी गंभीर जखमी झाले.मात्र नात कु पूर्वा अपघातातून सुखरूप बचावली आहे.आरे पिरळ रस्त्यावरील हिरवडे खालसा ते सडोली खालसा दरम्यानच्या टेलिफोन कार्यालयाजवळ रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्री झांजगे पती पत्नी यांना तातडीने कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे.अपघाताची माहिती समजताच केवळ दहा मिनिटात राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली होती.जखमी श्री खराडे हे हसूर विकास संस्थेचे विद्यमान संचालक असून ते पत्नी व नातीसह गावाकडे परत येत होते. अचानक कुत्रे आडवे आल्याने त्यांनी जोरात ब्रेक लावून मोटारसायकल सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो अयशस्वी झाल्याने मोटारसायकल घसरल्याने
पती पत्नी दोघेही रस्त्यावर पडले.यामध्ये त्यांच्यासह पत्नी सौ आनंदी आनंदा झांजगे वय ५० गंभीर जखमी झाले आहेत.तर नात कु पुर्वा सुरेश झांजगे वय ७ वर्षे ही आश्चर्यकारक बचावली असून तिला काहीही इजा झालेली नाही.अपघातस्थळी हसूरसह हिरवडे व सडोली गावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी गर्दी केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









