प्रतिनिधी / शिरोळ
मोटारीची वायर प्लगमध्ये लावत असताना शॉक लागून शिरोळ येथील सुशांत श्रीकांत शिंगाडे (वय १६, रा. पंचायत समिती निवासस्थानाजवळ) याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी पंजाबराव मुरमुरे यांनी दिली असून शिरोळ पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सुशांत शिंगाडे हा आपल्या घरात पाण्याच्या मोटारीची वायर प्लगमध्ये बसवत होता. त्यावेळी त्याला विजेचा शॉक लागला असता तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप करीत आहेत.
Previous Articleगांजा विकताना सांगली-सोलापूर जिह्यातील त्रिकुटाला अटक
Next Article धनगर आरक्षणासाठी पाठपुरावा करणार









