वारणानगर / प्रतिनिधी
भगतसिंग रोड,कोडोली (ता.पन्हाळा) येथील एकजन घरात कोणालाही न सांगता रस्त्यावर स्वत्ताची मोटर सायकल, मोबाईल रस्त्यावर सोडून बेपत्ता झाल्याने उलट सुलट चर्चाना उधान आले असून चंद्रकांत आप्पा चौगुले (वय ५५) असे त्याचे नाव आहे.
कोडोली पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची माहिती मुलगा कुणाल याने कोडोली पोलिसात दिली असून पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी. शुक्रवार दि. १४ रोजी पहाटे पाच वाजता चंद्रकांत हे शेताकडे जातो असे सांगून निघून गेले. ते परत आले नाहीत म्हणून त्यांची पैपाहुणे व इतरत्र शोधाशोध केले असता ते सापडले नसल्याने या बाबतची वर्दी देण्यात आली असून त्यांचे वर्णन रंगाने सावळे असून अंगाने जाडसर, नाक सरळ , डोळे काळे, पांढरे केस, उंचीने ५ फुट ५ इंच , ओठ डावे बाजुस ओढले गेलेले , अंगात पांढरे रंगाचा फुल शर्ट व खाकी फुल पँन्ट व डोक्याव पांढरी टोपी , पायात रबरी बुट , व भाषा मराठी स्पष्ट बोलतात या बाबतची व्यक्ती कोणी सापडल्यास कोडोली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करत आहेत. पुढील तपास फौजदार पवार करीत आहेत.
दरम्यान, चंद्रकांत चौगले यांची मोटरसायकल व त्यावर अडकलेल्या पिशवीत मोबाईल व लिहलेली चिठ्ठी मिळून आली सदर मोबाईल व चिठ्ठी पोलीसानी ताब्यात घेतली असून चिठ्ठीत कुणाकडून तरी येणे असल्याचे लिहले आहे असे सहा पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यानी सांगीतले तथापी वारणा नदी पात्रात तसेच आजूबाजूच्या शेतात पोलीसानी शोध घेतला असता चौगले हे मिळून आले नसल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









