प्रदेश युवा काँग्रेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
केंद्र सरकारने जारी केलेला नवीन मोटर वाहन कायदा म्हणजे सर्वसामान्य वाहनचालकांची डेके दुखी बनली आहे. गोव्यातही राज्य सरकारने 1 मे पासून या कायद्याची अमंल बजावणी करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. गोवा सरकारच्या या निर्णयाचा गोवा प्रदेश युवा काँग्रेसने निषेध केला आहे. सदर कायद्या रद्द करावा यासाठी प्रदेश युवा काँग्रेसने वाहतूक खात्याला निवेदन दिले आहे.
प्रदेश युवा काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर व इतर काही युवा कार्यकर्त्यांनी काल सोमवारी वाहतूक खात्याला निवेदन दिले आहे. कोवीड19 काळात विविध समस्या डोके वर काढीत असल्याने अगोदरच सामान्य जनता त्रस्त बनलेली आहे. त्यात या नव्या मोटर वाहन कायद्या जनतेच्या डोक्यावर लादल्याने जनता आणखीनच त्रस्त बनल आहे. राज्यात नव्या कायद्याची अमंल बजावणी करण्या गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचा विरोध असून मोटर वाहन कायदा जशास तसा ठेवावा अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेते, वाहतूक खात्याचे सचिव, वाहतूक विभागचे अधीक्षक उत्तर व दक्षिण, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष व दक्षिण गोवा जिहाध्यक्ष यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.









