गणपत गल्ली परिसरात पकडली जनावरे
प्रतिनिधी / बेळगाव
शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे नागरिक तसेच व्यापाऱयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेच्या कर्मचाऱयांनी गुरुवारी गणपत गल्ली परिसरात काही मोकाट जनावरांना पकडले आहे. त्यानंतर त्या जनावरांना गोशाळेमध्ये पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोरोनामुळे बाजारपेठेतील तसेच रस्त्यांवरील रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे आता जनावरे पकडणे सोपे झाले असून त्यासाठी मोहीम मनपाने उघडली आहे. गुरुवारी गणपत गल्ली, रविवारपेठ या परिसरातील मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.
ही जनावरे पकडताना कर्मचाऱयांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र बाजारपेठेमध्ये गर्दी नसल्यामुळे जनावरांना पकडणे सोयीस्कर झाल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले.









