रशियाची राजधानी मॉस्कोत मागील 24 तासांमध्ये 12 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील बळींचा आकडा 3,669 वर पोहोचला आहे. एक दिवसापूर्वी शहरात 14 जणांना जीव गमवावा लागला होता. रशियात बाधितांचे प्रमाण 6,13,994 झाले आहे. तर देशात 8,605 जण संसर्गामुळे दगावले आहेत. मॉस्कोमध्ये 2.16 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. रशियात मॉस्कोच कोरोनाचा केंद्रबिंदू ठरला असून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.

इस्रायल : 532 नवे रुग्ण इस्रायलमध्ये गुरुवारी 532 नवे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील बाधितांचे प्रमाण वाढून 22,044 झाले आहे. तर मृतांची संख्या 308 झाली आहे. देशात आतापर्यंत 15,940 रुग्णांनी संसर्गापासून मुक्तता मिळविली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 5,796 असून 4 मेनंतरचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे









