कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने ‘मॉडिफाइड लॉकडाउन’चे प्रारुप तयार पेल आहे. राज्य सरकारने स्वतःच्या नव्या योजनेसंबंधीचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे. राज्य सरकारकडून स्थापन कृतिदलाने ही योजना आखली आहे. राज्यातील स्थिती पाहून ‘मॉडिफाइड लॉकडाउन’चा अवलंब केला जाणार आहे.
मॉडिफाइड लॉकडाउननुसार राज्याला 4 क्षेत्रांमध्ये विभागले जाईल. हॉटस्पॉट तसेच मोठय़ा संख्येत रुग्ण सापडलेले क्षेत्र तसेच शहरांना लाल शेणी अंतर्गत ठेवले जाणार आहे. याचप्रकारे राज्याला अतिधोका, मध्यम धोका, धोकारहित आणि अल्प धोका क्षेत्रामध्ये विभागण्यात येणार आहे.
अतिधोका क्षेत्र
10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या भागांना अतिधोका क्षेत्रामध्ये सामील केले जाणार आहे. जयपूर, टोंक, जोधपूर, बांसवाडा, कोटा, बिकानेर, झुंझुनू, भरतपूर, भीलवाडा, जैसलमेर, दौसा चूरू आणि झालावाड यांचा अतिधोका क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
मध्यमधोका क्षेत्र
10 पेक्षा कमी परंतु 5 पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या भागांना मध्यमधोका क्षेत्रात वर्ग केले जाणार आहे. या वर्गवारीत अजमेर, अलवर, डूंगरपूर, नागौर, हनुमानगढ, करौली, पाली, सीकर, बाडमेर आणि उदयपूर यांना समाविष्ट करण्यात आले आहे.
अल्पधोका क्षेत्र
5 किंवा त्याहून कमी कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागांना अल्पधोका क्षेत्रात सामील करण्यात आले आहे. तसेच मागील 14 दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्हय़ांचा यात समावेश आहे. राजस्थानात आतापर्यंत दोनच जिल्हे असे सापडले असून यात धौलपूर आणि प्रतापगढ सामील आहे.
धोकारहित क्षेत्र
कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसलेल्या भागांना राजस्थान सरकारने धोकारहित क्षेत्रात वर्ग केले आहे. राजस्थानातील 8 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या जिल्हय़ांमध्ये श्रीगंगानगर, बारा, बूंदी, चित्तौडगढ, राजसमंद, जालौर, सिरोही आणि सवाईमाधोपूर सामील आहे.
नव्या योजनेंतर्गत कलर केडिंग
मॉडिफाइड लॉकडाउन प्रारुपाच्या अंतर्गत राजस्थानला 4 रंगांमध्ये विभागण्यात आले आहे. यात अतिधोका क्षेत्राला लाल शेणीत ठेवण्यात आले आहे. तर मध्यम धोका क्षेत्राला नारिंगी शेणी तर अल्पधोका क्षेत्राला पिवळय़ा आणि धोकारहित क्षेत्राला हिरव्या शेणीत वर्ग करण्यात आले आहे.









