प्रतिनिधी / बेळगाव
मैत्रेयी कलामंचतर्फे कॅम्प येथील बुढापा घर येथे महिला दिन साजरा करण्यात आला. येथील तीन आजी आणि त्यांची देखभाल करणाऱया साहाय्यक अशा सहा महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून रेखा गदे उपस्थित होत्या. प्रारंभी भारती गावडे यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. मेधा भंडारी यांनी परिचय करून दिला. डॉ. प्रेमण मेणसी यांनी त्यांचा सत्कार केला. अपर्णा पाटील, विजया उरणकर, मनीषा नाडगौडा व अक्षया येळ्ळूरकर यांनी आजींचा सत्कार केला. यावेळी रेखा गदे यांनी विनोदी कविता, विडंबन गीत सादर केले. तसेच दोन कथा सांगितल्या. पाहुण्यांच्या हस्ते मैत्रेयी कलामंचच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास रोशनी हुंदरे, विजया उरणकर, निकिता भडकुंबे, धनश्री मुचंडी, मधुरा गावडे, शितल पाटील, दीपा कुलकर्णी, अस्मिता आळते आदी उपस्थित होत्या.









