मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाने आता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला गुडबाय म्हटले आहे. देशातील दुसरे मोठे शहर असलेल्या मेलबोर्नने लॉकडाऊन मागे घेत मोकळा श्वास घेतला आहे. 50 लाखाहून अधिक लोकांचे शहर असलेल्या मेलबोर्नने लॉकडाऊनला बायबाय करत एकच जल्लोष केला. शहरातील लोक आता सर्रासपणे कॅफेना भेटी देत आहेत व आप्ते÷ांच्या घरीही जात आहेत. मेलबोर्नमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यावर सहाव्यांदा लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. या निर्णयामुळे 260 दिवस कठोर निर्बंधाखाली लोकांना रहावे लागले होते. लॉकडाऊनबाबत सरकारवर ताशेरे ओढण्यात आले असले तरी अनेकांचा जीव वाचला आहे, ही जमेची बाजूही आहे. 1590 जणांचा मृत्यू कोरोनाने आजवर झाला आहे. ऑस्ट्रेलियाने याप्रकरणी आतापर्यंत चांगली कामगिरी केल्याचे मानले जाते.









