वार्ताहर / पावस
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे दुपारी बारा वाजता दिवाकर परशुराम खर्डे यांच्या पाडीवर वाघाने हल्ला करून जखमी केले. त्यामुळे पुन्हा एकदा वाघाची दहशत दिसून येत आहे. रत्नागिरीतील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी सापळे लावलेले आहेत. त्याच बरोबर वनविभागाचे पुणे मुंबई या ठिकाणाहून ही पथके येऊन भेट देऊन गेलेले आहेत परंतु ते सर्व फोल ठरत आहे. त्यामुळे मेर्वी ग्रामस्थ वाघाच्या भीतीने भयभीत झालेले आहेत. मेर्वी गावातील ग्रामस्थ रात्री अपरात्री नोकरीनिमित्त फिनोलेक्स कडे सुद्धा जात येत असतात त्यामुळे सर्व ग्रामस्थ व कामगार भीतीचे छायेमध्ये आहेत.
वनविभागाने कित्येक दिवस मेर्वी परिसरात ठाण मांडलेल आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी कॅमेरे सापळे लावलेले आहेत परंतु वाघ मात्र वनविभागाच्या कर्मचायांच्या हातावर तुरी देऊन पलायन करतो आहे.
दिवसा ढवळ्या वाघ पाडीवर हल्ला करतो आहे. वनविभागाचे लोक करतात काय ? असा खडा सवाल शिवसेना पावस विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी केला आहे. यावर ते म्हणाले मा. मंत्री महोदय उदय सामंत यांना घेऊन मुंबईला प्रत्यक्ष वन मंत्र्यांची भेट घेणार आहेत. आणि वाघाच्या भितीमधून मेर्वी ग्रामस्थांना दिलासा देणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









