प्रतिनिधी/ रत्नागिरी
मेर्वी येथे बिबटय़ाकडून जनावरांना शिकार करण्यात येत आह़े नुकतेच मेर्वीत जंगलमय भागात चरायला गेलेल्या गाईला हल्ला करून बिबटय़ाने ठार केल़े खालची म्हादयेवाडी येथील अमोल अनंत मांडवकर यांच्या मालकीची ही गाय होत़ी दरम्यान या हल्ल्यामुळे बिबटय़ाची दहशत या परिसरात पसरली आह़े
मेर्वी येथे बिबटय़ाकडून करण्यात येणाऱया हल्ल्यामुळे वनविभागाकडून पिंजरे व पॅमेरे लावण्यात आले आहेत़ तसेच मुंबई येथील संजय गाधी नॅशनल पार्क व पुणे येथून वनविभागाची पथके रत्नागिरीत दाखल झाली आहेत़ मात्र या बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाह़ी मात्र सातत्याने बिबटय़ाचा मानवी वस्तीमध्ये वावर व होणारे हल्ले यामुळे मेर्वी येथे †िभतीचे वातावरण पसरले आह़े
वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्हि पॅमेरामध्ये भेकरे ससे आदी प्राणी दिसून आले होत़े मात्र बिबटय़ा दिसून आला नाह़ी मात्र गस्तीदरम्यान वनविभागाला बिबटय़ाच्या पावलांचे ठसे आढळून आले होत़े त्यानुसार ही बिबटय़ा मादी असून तिच्यासोबत बछडा देखील आहे हे स्पष्ट झाले होत़े त्यामुळेच ही बिबटय़ा मादी अधिक आक्रमक होत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आह़े ज्या भागात हल्ले होत आहेत, तेथे लाईट लावून दाट झाडे व गवत कापणार आहे. वनविभागाचे कर्मचारी झोपडी बांधून या परिसरात ठांण माडून बसणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी मुंबई व पुणे येथील पथके रत्नागिरीत दाखल झाली आहेत़ अधिकची कुमक रत्नागिरी वनविभागाच्या दिमतीला आल्याने आता बिबटय़ाला पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आह़े बिबटय़ा आपला मार्ग बदलून गाव दरीतून भ्रमण करीत असताना दिसत आहे. मात्र रेस्क्यू टीमचे पॅमेरे व पिंजरे लावले की, बिबटय़ा कुठेच दिसत नाही. त्यामुळे बिबटय़ा संचार करण्याचे क्षेत्राचा शोध घेणे गरजेजे ठरणार आह़े









