ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 4 रुग्ण आढळून आले आहेत. संत विहार गल्लीतील एक दाम्पत्य आणि त्यांच्याच दोन नातेवाईकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला.
मेरठमध्ये आतापर्यंत पाच जणांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या रुग्णांचे नमुने दिल्लीच्या सेंट्रल लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. आतापर्यंत 13 नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामधील सात जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह असून, पाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अजून एक रिपोर्ट येणे बाकी आहे.