मेरठ
ः उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी सकाळी एका प्रवासी रेल्वेच्या इंजिन आणि दोन डब्यांना आग लागली. ही दुर्घटना मेरठ शहरापासून 18 किमी अंतरावर घडली. यादरम्यान सुदैवाने प्रवाशांनी उडी मारून जीव वाचवल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, एका बोगीमधील प्रवाशांचे साहित्य आगीत बेचिराख झाले.
सहारनपूरहून दिल्लीला जाणारी प्रवासी रेल्वे मेरठनजिकच्या दौराला स्टेशनवर पोहोचली असताना आगीची घटना घडली. टेनच्या इंजिनला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर रेल्वेच्या एका डब्यातूनही अचानक धूर येऊ लागला. घाईघाईत रेल्वे कर्मचाऱयांनी आग लागलेले इंजिन आणि दोन डबे वेगळे केले. यानंतर रेल्वेच्या इतर बोगींना आगीपासून अलग करण्यात आले.









