स्त्रियांच्या आयुष्यात तीन मोठ्या महत्वाच्या प्रक्रिया घडतात. पहिली गोष्ट मासिक पाळी येणे , दुसरं मातृत्व आणि तिसरी गोष्ट पाळी जाणे. ह्यामुळे शरीरात बदल तर होतातच शिवाय मानसिक बदल देखील होतात. मासिक पाळी सुरू होणे आणि आई होणे ह्या गोष्टी आनंद देत असल्या तरी पाळी जाताना कुणाला फारसा आनंद वाटत नाही. पाळी जाण्याची घटना म्हणजेच मेनोपॉज . पाळी जाताना काहीना खूप त्रास होतो . तोच नेमका काय त्रास आहे आपण आज जाणून घेणार आहोत
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक जडणघडण वेगवेगळी असते.
त्यामुळे ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये सारख्याच तीव्रतेने जाणवणार नाहीत. काही स्त्रियांना काहीच त्रास जाणवत नाही किंवा जाणवला तरी अगदी सौम्य प्रमाणात जाणवतो.
एका क्षणाला आनंदी वाटणे तर दुसर्या क्षणी अचानक निराश वाटू लागणे
दरदरून घाम सुटणे
हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे रात्री झोपमोड झाल्याने दिवसभर पेंगुळल्यासारखे वाटणे
पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च वाटणे
विस्मरण होणे
पाळीचा अनियमितपणा
लवकर थकवा येणे
सांधे दुखणे
वजन , विशेषतः पोटावरची चरबी वाढणे
केस गळणे
आपोआप लघवी होणे
मेनोपॉजच्या काही वर्षे आधीपासून मासिक पाळी लांबणे, लवकर येणे, नेहमीपेक्षा अगदी कमी किंवा नेहमीपेक्षा थोडा जास्त रक्तस्त्राव होणे असे प्रकार होऊ शकतात.
३-४ महिने पाळी व्यवस्थित येऊन मध्येच ३-४ महिने बंद होणे, आणि काही महिने पुन्हा पहिल्यासारखी नियमित येणे असेही होऊ शकते.
ह्यात घाबरण्यासारखे काहीच नाही.
मेनोपॉजच्या वेळच्या हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे काहीही कारण नसताना उगीच डोळे भरून येणे, उदास-हतबल वाटणे असे घडू शकते.
बर्याच स्त्रियांमध्ये अपचन, पोट गच्च वाटणे ह्या तक्रारी दिसून येतात.
हॉर्मोनल असंतुलन हे एक कारण आहेच. पण त्यासोबत – व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी ह्या गोष्टीही कारणीभूत असतात.
उपाय
मेनोपॉजमुळे मानसिक शारीरिक बदल तीव्रतेने जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









