वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉप सीडेड मेदव्हेदेव, अमेरिकेचे जॉन इस्नेर आणि फ्रान्सेस टायफो यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्सी पॉपरिनचा 7-6 (7-3), 6-7 (7-9), 6-4 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या बिगर मानांकित टायफोने सर्बियाच्या लेजोव्हिकचा 1-6, 7-5, 6-3, अमेरिकेच्या जॉन इस्नेरने कॅनडाच्या ऍलीसिमेचा 7-6 (7-5), 7-6 (7-5) असा पराभव करत चौथी फेरी गाठली. मेदव्हेदेव आणि टायफो यांच्यात चौथ्या फेरीचा सामना होईल. जॉन इस्नेरने 2018 साली मियामी स्पर्धा जिंकली होती. स्पेनच्या सातव्या मानांकित ऍग्युटने जर्मनीच्या स्ट्रफचा 4-6, 6-3, 6-2, इटलीच्या सिनरने कॅचेनोव्हचा 4-6, 7-6 (7-2), 6-4 फिनलँडच्या रूसव्होरीने स्वीडनच्या वायमरचा 4-6, 6-1, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.









