वृत्तसंस्था/ लंडन
रशियाचा द्वितीय मानांकित पुरूष टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव्ह याच्यावर ‘हर्निया’ची शस्त्रक्रिया झाल्याने त्याला किमान दोन महिने टेनिसपासून अलिप्त रहावे लागणार आहे. या निर्णयामुळे त्याला क्लेकोर्ट हंगामाच्या सुरूवातीच्या कांही स्पर्धांना मुकावे लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्याला हर्नियाचा त्रास जाणवत होता. या व्याधीवर तो वैद्यकीय इलाज करवून घेणार असल्याने त्याला या उपचारानंतर काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. गेल्यावर्षी मेदवेदेव्हने फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मादीद आणि रोम एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धांमध्ये मेदवेदेव्हला केवळ एक सामना जिंकता आला.









