वृत्तसंस्था / पॅरिस
अमेरिकन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला हॅम्बुर्ग एटीपी टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जागतिक 41 व्या मानांकित फ्रान्सच्या युगो हम्बर्टने त्याला पराभूत केले.
हम्बर्टने अग्रमानांकित मेदवेदेव्हवर 6-4, 6-3 अशी मात केली. प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेआधीची ही शेवटची स्पर्धा आहे. 22 वर्षीय हम्बर्टची टॉप टेनमधील खेळाडूला हरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाचा मेदवेदेव्ह जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. या विजयाने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत हम्बर्ट हा स्थानिकांचा आशास्थान बनला आहे. त्याचाच देशवासी गेल मोनफिल्सलाही यानिक हन्फमनकडून 6-4, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला. हम्बर्टची पुढील लढत झेकच्या जॅन व्हेसेलीशी होईल. व्हेसेलीने फ्रान्सच्याच गिलेस सिमोनचा पराभव करून आगेकूच केली आहे.









