एकशे चाळीस वारकऱयांचा सहभाग
वार्ताहर /लातमबारसे
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा या संस्थेची पायी वारी सकाळी मेणकुरे येथील श्री देवी माऊली मंदिरातून सकाळी निघाली आणि दुपारी कोलवाळ येथे पोहोचली.
तत्पूर्वी झालेल्या एका छोटय़ाशा कार्यक्रमात मेणकुरे धुमासे ग्रामपंचायतचे सरपंच गुरुदास परब व देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष यांनी वारीला शुभेच्छा दिल्यानंतर वारी मार्गस्थ झाली. वारीत वारकरी माऊली पुरुष व स्त्रिया मिळून 140 जण सहभागी झाले होते.
ही वारी पिर्णा, नादोडा, रेवोडा , कोलवाळ असे मार्गक्रमण करीत दुपारी 2.30 वाजता कोलवाळ येथील श्री विठोबा मंदिरात पोहोचली. श्री विश्वकर्मा मंदिर ,श्री कालिकादेवी व श्री विठोबा मंदिरात स्थानापन्न झाली. श्री विठोबा मंदिरात रिंगण, हरिपाठ व आरती असा कार्यक्रम झाला तद्न?तर वारकऱयांसाठी अल्प?पहार झाला .विश्वकर्मा कालिका विठोबा मंदिराचे विश्वस्त श्री चंद्रशेखर च्यारी यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
वारी समवेत वारकरी संस्थेचे अध्यक्ष देवानंद नाईक, सचिव चंद्रकांत वंसकर व इतर पदाधिकारी स्वतःहून सहभागी होऊन उत्तमरीत्या वारी यशस्वी केली. विशेष म्हणजे कोरोना संकटातून मुक्ती मिळाल्यानंतर दोन वर्षांनी ही वारी झाल्याने भाविक वारकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दाखवून वारी सफल केली. वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱयांचे संस्थेचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी मनःपूर्वक आभार मानले.









