नवी दिल्ली
वरिष्ठ पत्रकार तथा उद्योजक अनुरंजन झा यांनी लाऊक नावाने मेड इन इंडियाअंतर्गत व्हिडियो कॉन्फरन्सिंग ऍप नुकतेच लाँच केले आहे. वेब स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मसह लाऊक क्लासरूमची सुविधा देणार आहे. तसेच वेबीनार आणि इतर सेवांचाही ऍपवर लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आत्मनिर्भर भारत या अंतर्गत ही नवी व्हिडीयो ऍपची सुविधा झा यांनी सुरू केली आहे.









