ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर थोड्याच वेळात संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण पेपरलेस असून, ते मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर केले जाणार आहे.
अर्थसंकल्पासाठी तयार करण्यात आलेला टॅबलेट हा मेड-इन-इंडिया आहे. संसदेच्या सदस्यांना अर्थसंकल्प सॉफ्ट कॉपीच्या रुपाने मिळणार असून, सर्वसामान्यांसाठी तो ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल.
सर्वसामान्य जनतेपर्यंत हा अर्थसंकल्प पोहचवा यासाठी ‘युनियन बजेट’ ॲप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केले आहे. हे ॲप यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल. या ॲपद्वारे स्मार्टफोन युजर्स अर्थसंकल्प वाचू शकतात.









