मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद : कापडगांवला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजसाठी जागेचा प्रश्न प्रश्न मार्गी लागला आहे. कापडगाव येथे जागा निश्चित झाली होती मात्र सिव्हील, मनोरूग्णालय आणि महिला रूग्णालय या तिन्ही जागा मिळून निकषांची पूर्तता व अन्य तांत्रिक बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबत शासनादेश जारी होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगिलते.
मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2021 पासून 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला याठिकाणी प्रारंभ होणार आहे. कोपडगाव येथील जागा विचारात घेण्यात आली होती. मात्र त्याची आवश्यकता लागणार नाही. ती जागा अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी वापरात आणता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार केला जाईल. सद्यस्थितीत रत्नागिरीत मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.









