उग्रवाद्यांच्या विरोधात राबविण्यात आली मोहीम
वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयातील रेचांगरे गावात मंगळवारी दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्स्पलोजिव्ह डिव्हाइस (आयईडी) मिळाले आहेत. मेघालयाच्या वेस्ट गारो हिल्समध्ये उग्रवाद्यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान इक आयईडी प्रेशर कुकरमध्ये आणि दुसरा टिनच्या प्लेन बॉक्समध्ये आढळून आला आहे. दोन्ही आयईडी नष्ट करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.
तर एका अन्य उग्रवादविरोधी मोहिमेत वेस्ट गारो हिल्स पोलिसांनी तुरापासून 15 किलोमीटर अंतरावरील डुमागिटोक गावात एक जिवंत गेनेड आणि दारूगोळा जप्त केला आहे. ईशान्येत अनेक उग्रवादी गट सक्रीय असल्याने तेथे सुरक्षा दलांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. अनेक उग्रवादी संघटनांनी शस्त्रs म्यान केली असली तरीही काही गट म्यानमारमधून सक्रीय आहेत.









