प्रजासत्ताक दिनी ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासकीय नोकर भरती प्रक्रीयेला स्थगिती देण्याबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्य सरकार विरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक दसरा चौकातून आंदोलनाचे रणशिंग फुंकून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. तरी मराठा समाज बांधवांनी मंगळवार 26 रोजी सकाळी 10.30 वाजता दसरा चौकात उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात निर्णय होत नाही, तोपर्यंत शासकीय नोकर भरती, स्पर्धा परीक्षांना स्थगिती देण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. मात्र मराठ्यांच्या मागणीकडे दूर्लक्ष करत राज्य सरकारने शासकीय नोकर भरतीचा घाट घातला आहे.
सरकारचा हा निर्णय मराठा समाजावर अन्याय करणारा असून विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे भरती स्थगित करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला 25 जानेवारीचा अल्टीमेटम देण्यात आला होता. यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून दसरा चौकात ठिय्या आंदोलनही सुरु आहे. मात्र सरकारने मराठा समाजाची दखल न घेता भरती स्थगितीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा