झाडाखाली अभिनेत्रीला केले प्रपोज
लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल मेगन फॉक्सने स्वतःचा प्रियकर मशीन गन केलीसोबत एंगेजमेंट केली आहे. यासंबंधीची माहिती मेगने सोशल मीडियावर केलीसाबतचा एंगेजमेंटचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिली आहे. या व्हिडिओत एका अत्यंत सुंदर ठिकाणी गन केली गुडघ्यांवर बसून मेगनला प्रपोज आणि एंगेजमेंट रिंग घालताना दिसून येतो.
दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना अत्यंत पसंत पडत असून सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होतोय. मेगनसाठीची अंगठी गन केली यानेच डिझाइन केली होती.

35 वर्षीय मेगन फॉक्स आणि मशीन गन केली लवकरच विवाह करणार आहेत. दोघांनी हा विवाह केल्यास मेगनचा हा दुसरा विवाह ठरणाल आहे. मेगनने यापूर्वी 2010 मध्ये अभिनेता ब्राइन ऑस्टिनसोबत विवाह केला होता. मेगनला पहिल्या विवाहापासून 3 मुलगे देखील आहेत. ऑक्टोबर महिन्यात मेगन आणि ब्रायन यांचा घटस्फोट झाला होता.
31 वर्षीय प्रसिद्ध रॅपर गन केली याचा हा पहिलाचा विवाह असणार आहे. परंतु पूर्वीच्या रिलेशनशिपमध्ये त्याला एक मुलगी आहे. मशीन गन केलीचे मूळ नाव कोल्सन बेकर आहे. मेगन फॉक्सला ‘ट्रान्सफॉर्मर्स’, ‘टिल डेथ’ आणि ‘जेनिफर्स बॉडी’ यासारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखले जाते.









