ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोमध्ये बुधवारी 5 हजार 714 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 579 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत 22 लाख 08 हजार 755 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 99 हजार 627 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत 22.08 लाख रुग्णांपैकी 17 लाख 48 हजार 317 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 60 हजार 811 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4,798 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात 13 क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा तिसरा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 59 लाख 57 हजार 631 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.