ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोमध्ये बुधवारी 15 हजार 873 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1 हजार 235 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत 15 लाख 71 हजार 901 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 36 हजार 917 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत 15.71 लाख रुग्णांपैकी 11 लाख 76 हजार 658 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 58 हजार 626 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 5,270 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात बाराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 39 लाख 59 हजार 712 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.